मुंबई

बालवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची मागणी

CD

बालवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची मागणी

नेरूळ, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी श्रमिक सेनेने केली आहे. गेल्या सात वर्षांपासून मानधनात वाढ न झाल्याने महागाईच्या काळात तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. यासंदर्भात श्रमिक सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर सुजाता पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत विविध प्राथमिक शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग चालविले जातात. या बालवाड्यांमध्ये सध्या ११५ शिक्षिका आणि ११३ मदतनीस कार्यरत आहेत. बालवाडी शिक्षिकांना दरमहा १६ हजार ५०० रुपये, तर मदतनस यांना २३ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते. यापैकी अनेक कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षांपासून महापालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. इतकी वर्षे सेवा करूनही मागील सात वर्षांत मानधनात वाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बालवाडीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने शिक्षिका आणि मदतनीस यांच्या कामाचा व्यापही वाढला आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या, कामाची जबाबदारी आणि वाढती महागाई यांचा विचार करता कर्मचाऱ्यांच्या मानधनात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT