मुंबई

कडापेची कालिकाई माता

CD

कडापेची कालिकाई माता
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कडापे गावात वसलेले श्री कालिकाई माता व श्री बापूजीबुवा मंदिर हे शाक्तपंथीय कायस्थ समाजाचे महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या देवस्थानात नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी माणगाव तालुक्यासह परिसरातील असंख्य भाविक गर्दी करतात.
सध्याच्या कांदळगाव-जिता हमरस्त्यालगत एका छोट्याशा टेकडीवर श्री कालिकाई माता व श्री बापूजीबुवा मंदिर वसलेले आहे. विविध गोत्रांतील कायस्थ कुटुंबे श्री कालिकाई मातेला आपली कुलदेवता मानतात.
प्रचलित आख्यायिकेनुसार, श्री कालिकाई माता रौद्र स्वरूपात उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गक्रमण करीत असताना श्री बापूजीबुवा या पुण्यपुरुषाने देवीला शांत केले आणि तिचे रौद्र रूप रोखले. या आख्यायिकेमुळे मंदिरात श्री कालिकाई माता व श्री बापूजीबुवा यांची मुखे दक्षिणोत्तर दिशेला असल्याचे सांगितले जाते.
शाक्तपंथीय परंपरेमध्ये सात बहिणींचा उल्लेख आढळतो. यामध्ये तळा येथील श्री चंडिकामाता, कडापेची श्री कालिकाई माता (कडापकरीण), वानस्ते गावची श्री कालिकाई माता (वानस्तेकरीण), खाजणी गावची श्री खाजणाई, डोंगर आळीची कालिकाई, श्री वावेकरीण आणि श्री पिष्ठई माता यांचा समावेश असल्याचे प्रचलित माहितीत सांगितले जाते. या सात देवींच्या परंपरेला स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष महत्त्व आहे.
श्री कालिकाई मातेचे मूळ स्वरूप तांदळ्याचे असून, त्यावर देवीचा मुखवटा व स्वरूप सजवून साडीचोळी नेसवली जाते. परिसरातील असंख्य सुवासिनी श्रद्धेने देवीची ओटी भरतात. चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.
यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे उंच बांबूच्या सुशोभित सासनकाठ्या. वाद्यांच्या गजरात या सासनकाठ्या नाचवत देवीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर त्या देवीसमोर ठेवल्या जातात.
मूळ आडनाव कर्णिक असलेले आणि पुढे महाडकर टिपणीस म्हणून ओळखले जाणारे भार्गव गोत्री कुटुंब श्री कालिकाई मातेला आपली कुलदेवता मानते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT