मुंबई

दूंदरे ते वाकडी या नवीन काँक्रिट रस्त्याला दिड वर्षाच्या आतच भेगा

CD

काँक्रीट रस्त्याचा बोजवारा!
दुंदरे-वाकडी मार्गावर दीड वर्षातच भेगा; ग्रामस्थांची निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

नवीन पनवेल, ता. १४ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील दुंदरे ते वाकडी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला अवघ्या दीड वर्षाच्या आतच भेगा पडल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जा आणि संभाव्य भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, या मार्गावरील खड्डे आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालकांचा प्रवासही धोकादायक बनला आहे.
काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याला इतक्या कमी कालावधीत भेगा पडल्याने बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, सिमेंट-वाळू-खडीचे प्रमाण आणि कामाची गुणवत्ता यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. काँक्रीट पुरेसे मजबूत होण्यासाठी आवश्यक पाणी देण्याची प्रक्रिया तसेच रस्त्याचा पाया मजबूत करण्यासाठी केलेली पूर्वतयारी यामध्ये त्रुटी राहिल्या असाव्यात, अशी शंका स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र, या त्रुटींची अधिकृत तांत्रिक तपासणी झाल्याची माहिती उपलब्ध नाही.

अर्धवट रस्ता, खड्ड्यांचा त्रास
दुंदरे ते वाकडी हा सुमारे साडेसात किलोमीटर लांबीचा रस्ता दोन टप्प्यांत विभागलेला आहे. या मार्गावरील काही भागाचे काँक्रीटीकरण करण्यात आले असले, तरी उर्वरित भागाचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एका बाजूला काँक्रीट रस्त्याला पडलेल्या भेगा, तर दुसऱ्या बाजूला खड्ड्यांनी व्यापलेला मार्ग, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, वाहनचालक आणि रोज ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निधी आणि मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब
या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून काही वर्षांपूर्वी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून केवळ ७०० ते ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण शक्य झाले. संपूर्ण रस्त्याच्या सुधारणेसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, मंजुरीला विलंब झाल्याने रस्त्याचे काम रखडले होते. संबंधित यंत्रणांकडून या मार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
तांत्रिक तपासणी आवश्यक
ऐन सणासुदीच्या काळात या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून अपूर्ण काम पूर्ण करावे तसेच काँक्रीटीकरणाच्या दर्जाची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.


गेली अनेक वर्षे आमच्या विभागातील ग्रामस्थांना खराब रस्त्याचा सामना करावा लागत होता. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी वाकडी ते दुंदरे या रस्त्याच्या काही भागाचे काँक्रीटीकरण करण्यात आले. काँक्रीट रस्त्याचे आयुष्य किमान २० वर्षे अपेक्षित असताना अवघ्या एका वर्षातच त्याला भेगा आणि खड्डे पडणे ही गंभीर बाब आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू आहे का? प्रशासनाने या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी.
- सुभाष भोपी, सरपंच, दुंदरे ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : राहुल गांधींच्या याचिकेतील तांत्रिक त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात सुनावणी निश्चित

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT