मुंबई

एम. फार्मसी, फार्म.डी. (पी.बी.)च्या तिसऱ्या यादीत १२३८ विद्यार्थ्यांना संधी

CD

एम. फार्मसी, फार्म.डी. (पी.बी.) तिसरी यादी जाहीर
मुंबई, ता. १४ : राज्यात दोन वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र एम. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या व तीन वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर फार्म.डी. (पी.बी.) या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीसाठी सात हजार ७३५ विद्यार्थ्यांनी पसंती दाखविली होती. त्यापैकी १,२३८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ९९९ विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

तिसऱ्या यादीसाठी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत सात हजार ७३५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी १२३८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.

तिसऱ्या यादीत ९९९ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या सहापैकी एका पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे हे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत उतरावे लागेल. विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर १८ ऑक्टोबर २०२६ २०२६ला चौथ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पुण्याला मिळाले नवीन वैद्यकीय महाविद्यालय! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु

Vastu Tips: कपाटाच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' ५ गोष्टी; घरात येऊ शकते गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा! जाणून घ्या वास्तुनियम...

IPL 2027 Trade: यॉर्करने भल्याभल्यांना गार करणारा गोलंदाजाचं SRH संघात पुनरागमन, पण कोटींचं नुकसान; दिल्ली कॅपिटल्ससोबत मोठी ट्रेड

Mulshi News : दुष्काळग्रस्त असलेल्या तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळला; तालुक्यातील शेतकरी शासनाविरोधात आक्रमक

गोकुळच्या स्टेजवर जुना हिशेब? अमर खोत आणि बाबासाहेब असुर्लेकर यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT