म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
- २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत ४,४६२ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लॉटरीकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना २२ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दरम्यान, सदर लॉटरी आतापर्यंत एक लाख ६७,५७० अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह एक लाख ४,०८६ अर्ज प्राप्त आहेत.
म्हाडाने लाॅटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून सुरू केली आहे. सोडतीमध्ये १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी पुणे येथील मांजरी खुर्द, म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महापालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.