मुंबई, ता. १५ : राज्यातील सर्व माध्यमांच्या एक लाख आठ हजार शाळांमधील सुमारे दोन कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्री भुसे यांनी सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईडचा विस्तार करण्याबाबत बैठक घेतली. राज्यातील ३० हजार शाळांमधील सुमारे १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना सध्या स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या वेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (ऑनलाइन), ‘एससीईआरटी’चे संचालक मंगेश जोशी (ऑनलाइन), उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहाय्यक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘राष्ट्र प्रथम’ संकल्पना केंद्रस्थानी
‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शालेय शिक्षण विभाग काम करीत आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड असणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवरील कवायत बंधनकारक करावी. तसेच ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन तासिका यासाठी घेण्यात याव्यात. स्काऊट-गाईड उपक्रमासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुका स्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण द्यावे. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.