मुंबई

१०० शाळांना ‘किशोर’ मासिक मोफत

CD

१०० शाळांना ‘किशोर’ मासिक मोफत

वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी उपक्रम

पालघर, ता. १५ (बातमीदार) : वाचन प्रेरणा दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या १०० माध्यमिक शाळांना वर्षभरासाठी ‘किशोर’ मासिक विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने आणि इंग्लंडमधील ‘कलासंस्कृती’ समूहाच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक शाळांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे आणि वाचनसंस्कृती रुजविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाला १९७१ पासूनची परंपरा आहे. विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध व्हावे आणि त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, यासाठी हे मासिक वर्षभर विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. मागील वर्षी राज्यातील १३६ मराठी शाळांना या उपक्रमांतर्गत मासिक देण्यात आले होते.

मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य तथा जिल्हा समन्वयक सुशील शेजुळे यांनी ही माहिती दिली. नोंदणी केलेल्या शाळांना पुढील महिन्यापासून मासिक उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी सुशील शेजुळे (९६०४५२३६६६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT