मुंबई

कौलारू मंदिरात शीतलादेवीचे तेजस्वी रूप

CD

कौलारू मंदिरात शीतलादेवीचे तेजस्वी रूप

पुरातत्त्व दगडी बांधकामाच्या टुमदार-कौलारू अशा ऐतिहासिक मंदिरातील शीतलादेवी मातेच्या तेजपुंज रूपाचे दर्शन घेण्यासाठी माहीम येथील शीतलादेवी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. मुंबईतील माहीमच्या बेटावर सुमारे ५०० ते ६०० वर्षांपूर्वी या देवीची प्रतिष्‍ठापना केली गेली, असा इतिहास स्‍थानिक सांगतात.
उत्सवाच्या दिवसात देवीला सोन्याचा मुखवटा घालण्यात येतो तसेच नऊ दिवस गोंड्याच्या फुलांच्या माळा घालण्यात येतात व नऊ दिवस रेशीम साड्या परिधान केल्या जातात. माहीम येथे असलेल्या शीतलादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज दीड ते दोन हजार भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून, त्यांची या देवीवर नितांत श्रद्धा आहे. या पुरातन मंदिरात शांतादुर्गा, साईबाबा, गणपती, विठ्ठल-रखुमाइ, शंकर आणी गजानन महाराजांची छोटी मंदिरे आहेत. पाषणाचा मुखवटा असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविक दूरहून येतात.
काली, चंडिका किंवा महिशासूरमार्दिनी ही देवीची उग्र रूपे आहेत, मात्र या देवीचे रूप शीतल आहे. याच शीतलादेवीच्या नावावरून माहीम परिसरातील बस थांबा तसेच मेट्रो स्थानके ओळखली जातात. मंदिरात नवरात्रीतील नऊ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दररोज सकाळी सनई, चौघडे वाजविले जातात. सायंकाळी विविध मंडळांचे महिलांचे भजन, रात्री आरती करण्यात येते.
पंचमीच्या दिवशी शांतादुर्गा देवीची ओटी भरण्यासाठी सुवासिणी मंदिरात येतात, तर कुमारी पूजनदेखील करण्यात येते. तसेच अभिषेक, कुंकूमार्चन नित्यनेमाने केले जाते. परिसरातील नागरिकांकडून तसेच सेलिब्रिटिंकडून आरती करण्यात येते. अनेक ठिकाणाहून महिलांनी बनविलेला प्रसाद देवीला दाखवण्यात येतो, अशी माहिती जीएसबी टेम्पल ट्रस्टचे खजिनदार अमेय आकेरकर यांनी दिली. पंचमी आणी अष्टमी हे महत्वाचे मानले जातात. अष्टमीला अनेक जण होमात नारळ टाकण्यासाठी येतात. सौभाग्यवती या देवीची ओटी भरायला येते. त्यामुळे त्यांचे सौभाग्य चिरायू राहते, अशी प्रत्येक सौभाग्यवतीची समज आहे. तर मंदिर परिसरातील विहिरीचे खास वैशिष्ट्य आहे. या विहिरीतल्या पाण्याने अंघोळ केल्यास कांजण्या बऱ्या होतात, असादेखील समज आहे.

अख्यायिका
मुंबईतील माहीमच्या बेटावर सुमारे ५००-६०० वर्षांपूर्वी काही भाविकांना शीतलादेवीचा पाशानाचा मुखवटा सापडला. त्या वेळी तिथल्या स्थानिकांनी तिची स्थापना केली. एरव्ही काली किंवा महिशासूरमार्दिनीचे उग्र रूप धारण करणारी देवी येथे मात्र शीतल रूप धारण करते. त्‍यामुळे ही देवी शीतलादेवी या नावाने ओळखली जाते. १८७९ मध्‍ये गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) मंदिर व्यवस्थापनाने शीतलादेवी मंदिराची व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. या ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद महाले, सचिव दिनेश प्रभू, खजिनदार अमेय आकेरकर हे व्यवस्थापनाचा कारभार सांभाळतात.

– संकलन ः रजनीकांत साळवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT