मुंबई

मेंदूच्या रक्तवाहिनीजवळ अडकलेली गोळी दुर्बिणीतून काढली

CD

मेंदूच्या रक्तवाहिनीजवळ अडकलेली गोळी दुर्बिणीतून काढली

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रयत्न

मुंबई, ता.१५ : कवटीच्या तळाशी मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिनीजवळ अडकलेली सुमारे एक सेंटीमीटरची गोळी जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे काढली. अतिशय अरुंद आणि संवेदनशील भागात गोळी अडकलेली असल्याने ती बाहेर काढताना रक्तवाहिनीला इजा होण्याचा धोका होता. न्यूरोसर्जरी आणि कान-नाक-घसा विभागाच्या डॉक्टरांनी आधुनिक प्रतिमानिर्देशन तंत्रज्ञान, ‘सी-आर्म’ आणि दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली.
कवटीच्या तळाचा भाग हा मेंदूच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि नसांच्या जवळ असल्याने या भागातील शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. या रुग्णाच्या कवटीच्या तळाशी अडकलेली गोळी अंतर्गत कॅरोटिड रक्तवाहिनीच्या अगदी जवळ होती. गोळी आकाराने लहान असल्याने तिचे अचूक स्थान निश्चित करणे आणि सुरक्षितपणे काढणे हे डॉक्टरांसमोरचे मोठे आव्हान होते.

तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक स्थान निश्चित-
गोळीचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रतिमानिर्देशन तंत्रज्ञान आणि ‘सी-आर्म’चा वापर करण्यात आला. त्यानंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात आली. कान-नाक-घसा आणि न्यूरोसर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी संयुक्तपणे ही प्रक्रिया केली.न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. वर्णव वेल्हो आणि कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. हृषीकेश आणि कान-नाक-घसा विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. नवीन सिंह यांनीही उपचारात सहभाग घेतला. भूलतज्ज्ञ डॉ. अनंथन कृष्णन आणि डॉ. अरुणांधी यांनी भूल व शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक वैद्यकीय मदत दिली. कवटीच्या तळाशी असलेल्या गुंतागुंतीच्या भागातील शस्त्रक्रियेसाठी विविध विभागांतील डॉक्टरांमध्ये समन्वय आवश्यक असतो. या प्रकरणातही कान-नाक-घसा आणि न्यूरोसर्जरी विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

Caller ID: आता अनोळखी कॉल्सचा खेळ खल्लास; Jio, Airtel, Vi ग्राहकांसाठी मोठा निर्णय, १ नोव्हेंबरपासून...

Marathi News Live Updates: "आम्ही निवडणुकीतून सत्ता बदलणारच!"; राजनाथ सिंह यांच्या 'सत्तापालट' आरोपावर पवन खेडांचा पलटवार

Anand Dubey: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाने सोडली पक्षाची साथ, मशाल सोडून हाती घेतलं धनुष्यबाण

Kannad News : दुष्काळ, नापिकी आणि बेरोजगारीच्या चिंतेतून तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT