पनवेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
नवीन पनवेल, ता. १५ (बातमीदार) : पनवेलमध्ये भाजपला धक्का बसला असून, महापालिकेचे माजी प्रभाग समिती सभापती आणि माजी नगरसेवक गोपीशेठ भगत तसेच जय महाकाली ट्रस्टचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
या वेळी अनंत गीते, उपनेते बबनदादा पाटील आणि संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते नव्या सदस्यांना शिवबंधन बांधण्यात आले. तसेच, त्यांच्या हातात पक्षाचा झेंडा देऊन अधिकृत सदस्यत्व प्रदान करण्यात आले. या पक्षप्रवेश सोहळ्याला सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख समाधान काशिद, विभागप्रमुख रामदास गोवारी, युवा नेते सुनील गोवारी, सुवर्णा वाळुंज, शहर संघटिका संगीता राऊत, नगरसेविका मेघना घाडगे, प्रिया गोवारी, रितिक्षा गोवारी, प्रभागप्रमुख बबन गोगावले, गणेश खांडगे, मनोज जाधव, प्रभाकर गोवारी, धाया गोवारी आणि संतोष गोळे यांच्यासह शाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.