मुंबई

एसआयआरमध्ये फॉर्म सातचा गैरवापर : जितेंद्र आव्हाड

CD

एसआयआरमध्ये फॉर्म सातचा गैरवापर
जितेंद्र आव्हाड : मुंब्र्यात २८० मतदारांची नावे वगळली; सोमवारी पोलिसांत तक्रार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत फॉर्म क्रमांक सातचा गैरवापर करून मुंब्र्यातील सुमारे २८० मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (ता. १७) केला. संबंधित मतदारांनी अर्ज भरलेले नसतानाही त्यांच्या नावाने अर्ज दाखल झाल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी सोमवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले.

आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, फॉर्म क्रमांक सातवर मतदारांचे क्रमांक टाइप केलेले असून, त्यावर नागपूरचा पोस्टल पिनकोड आहे. काही कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या नावांनीही अर्ज दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही. मतदार पडताळणीसाठी नियुक्त २२१ बूथस्तरीय अधिकाऱ्यांपैकी ६९ अधिकारी पहिल्या दिवसापासून कामावर आले नसल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. प्रत्येक अर्जाची सत्यता तपासून प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली. पत्रकार परिषदेला शमीम खान, यासीन कुरेशी आणि प्रकाश पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT