मुंबई

माटुंग्याची ग्रामदेवता मरुबाई देवी

CD

माटुंग्याची ग्रामदेवता मरुबाई देवी

मुंबईच्या सात बेटांपैकी शीव बेटाची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मरुबाई देवी मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. ब्रिटिशकालीन पुनर्वसनाच्या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या या मंदिराची परंपरा शतकाहून जुनी असून, देवीच्या नावामागेही एक रंजक आख्यायिका प्रचलित आहे.
श्री मरुबाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या तेजस्वी रूपाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक मंदिरात येत आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीला नियमित अभिषेक, कुमारीपूजन, हवन आणि कुंकुमार्चन करण्यात येते. तसेच दररोज देवीला साडी नेसविण्यात येते. दसऱ्याला शमीपूजन, तर प्रत्येक पौर्णिमेला नवचंडी यज्ञ केला जातो.
श्री मरुबाई गावदेवी मंदिर ग्रामस्थांनी १८८८ मध्ये ताब्यात घेतले. त्यानंतर १९५२ मध्ये मंदिरासाठी विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आली, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अनिल गावंड यांनी दिली. मंदिराची उभारणी करणाऱ्या कारागिराने आग्रा येथील फतेहपूर परिसरात देवीच्या नावाने औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि इंटर कॉलेजही बांधल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या सात बेटांपैकी शीव हे एक बेट असून, मरुबाई देवी ही या बेटाची ग्रामदेवता मानली जाते. महेश्वरी उद्यानाजवळ देवीचे मूळ स्थान होते. ब्रिटिशांच्या काळात १८८८ मध्ये या परिसराचा विकास करण्यासाठी जमीन ताब्यात घेण्यात आली आणि येथील ग्रामस्थांचे सायन येथे पुनर्वसन करण्यात आले. त्या वेळी ब्रिटिशांनी दोन गुंठे जागेत देवीचे मंदिर बांधले. मंदिराभोवतालची सुमारे २०० एकर जागा शैक्षणिक कार्यासाठी राखीव ठेवण्यात आली. याच परिसरात व्हीजेटीआय, खालसा महाविद्यालय, डॉन बॉस्को हायस्कूल आणि एसएनडीटी यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या.
पूर्वी मंदिरासमोर गोड्या पाण्याचा तलाव होता, तर बाजूला मोठी खाडी होती. मोठ्या वादळांमुळे खाडीतील खारे पाणी गोड्या पाण्यात मिसळून रोगराई पसरत असे, अशी त्या काळातील समजूत होती. अशा वेळी देवीला अभिषेक केल्यानंतर पाणी शुद्ध होत असे आणि ते प्यायल्याने लोक रोगराईतून वाचत असत, अशी श्रद्धा होती. त्यामुळे मृत्यूपासून वाचविणारी देवी, अशी आख्यायिका प्रचलित झाली आणि देवीला ‘मरुबाई’ हे नाव पडले, असे गावंड यांनी सांगितले.

संकलन : रजनीकांत साळवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात; महायुतीच्या व्यासपीठावरील उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT