मुंबई

दुचाकीला धडक लागल्याच्या वादातून कारचालकाची चाकूने भोसकून हत्या

CD

किरकोळ धडक ठरली जीवघेणी
कल्याणमध्ये कारचालकाची चाकूने भोसकून हत्या
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : वाहनाला झालेली किरकोळ धडक, त्यातून सुरू झालेल्या वादात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. कल्याणमधील वडवली परिसरात शनिवारी (ता. १७) रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. दुचाकीला कारची धडक लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात राज मढवी या कारचालकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी विकास यादव, सौरभ साळुंखे आणि एका महिलेला अटक केली आहे.

राज मढवी यांच्या कारची कल्याणमधील वडवली येथील अ-प्रभाग कार्यालयाजवळ एका दुचाकीला धडक लागली होती. या धडकेत दुचाकीचे काही भाग खराब झाल्याने नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावरून राज आणि आरोपींमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. आरोपींनी राज यांच्यावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या राज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. आरोपी घटनेच्या वेळी नशेत होते का, तसेच या वादामागे अन्य काही कारण होते का, याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबाराची माहिती; पोलीस तपास सुरू

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

SCROLL FOR NEXT