मुंबई

पनवेलमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता

CD

पनवेलमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता
कासारभाट, तारा, गव्हाणमधील पदे रिक्त; पशुधनाच्या उपचारांसाठी शेतकऱ्यांची धावपळ
नवीन पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने पशुधनाच्या आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या १० आणि राज्य शासनाच्या एका दवाखान्यातून पशुधनाला उपचार दिले जातात, मात्र कासारभाट, तारा आणि गव्हाण येथील दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारांसाठी इतर केंद्रांमध्ये जावे लागत आहे. ही पायपीट थांबवण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
या तीन दवाखान्यांमध्ये पशुधन विकास अधिकारी कार्यरत असले तरी इतर केंद्रांतील डॉक्टरांवर अतिरिक्त जबाबदारी येत आहे. विशेषतः आदिवासी आणि डोंगराळ भागांत पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जनावरांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असून, उपलब्ध यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
पनवेल तालुक्यात सहा हजार ९६४ गायी-बैल, सहा हजार २७२ म्हशी-रेडे, नऊ हजार ९२ शेळ्या-बोकड, ८३ मेंढ्या, ५७ घोडे आणि २१ हजार ३७५ कुत्रे असे एकूण ४३ हजार ८४३ पशुधन आहे. या पशुधनासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

चारा आणि विमा योजनांवर भर
पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा म्हणून पहिल्या टप्प्यात पशुपालकांना ५६० किलो संकरित मका बियाणे देण्यात आले आहे. पशुधन विमा योजनेत विमा हप्त्यावर ८५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. गाय-बैलांसाठी ७० हजार, म्हैस-रेड्यांसाठी ८० हजार आणि शेळी-मेंढीसाठी ६० हजार रुपयांची विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सहाय्यक आयुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले की, तीन केंद्रांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त असली तरी तेथे पशुधन विकास अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होऊ दिली जात नाही. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पशुधन विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जळगावच्या कुंभारीत पोलीस प्रशिक्षण केंद्र, जामनेरमध्ये मुलींचे वसतिगृह; मंत्री अशोक उइके यांची घोषणा

SCROLL FOR NEXT