मुंबई

जुन्या वृक्षाच्या अस्तित्वाला धोका!

CD

जुन्या वृक्षाच्या अस्तित्वाला धोका!

स्थानकाच्या नूतनीकरणातील राडारोडा वृक्षाच्या बुंध्याशी

कांदिवली : रेल्वे स्थानकांचा कायापालट करून प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू असताना, कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील जुन्या पर्जन्यवृक्षाच्या अस्तित्वावरच संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामातून निघालेला राडारोडा, रेती आणि खडीचे ढिगारे या वृक्षाच्या बुंध्याशी टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वृक्षाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, रेल्वे प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत पर्यावरणप्रेमी आणि प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.कांदिवली स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त डेक, सरकते जिने, फलाट आणि येण्या-जाण्यासाठी सुलभ मार्ग उभारण्याची कामे सुरू आहेत. मात्र, या विकासकामांतून निघालेल्या बांधकाम साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी तिकीट घराशेजारील मार्गावर असलेल्या जुन्या पर्जन्यवृक्षाच्या बुंध्याशीच त्याचे ढिगारे साचविण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे स्थानकाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही पाळली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुशोभीकरणाच्या कामात वृक्षाकडे दुर्लक्ष

वृक्षाच्या बुंध्याभोवती बांधकाम साहित्याचे ढिगारे साचले असून, परिसरात पान, गुटख्याच्या पिचकाऱ्या आणि कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. बुंध्याभोवती राडारोडा साचल्याने मातीतील हवा आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याची शक्यता आहे. याचा वृक्षाच्या मुळांवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

स्थानकाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या जुन्या वृक्षाची अशी अवस्था होत असताना, संबंधित यंत्रणांचे लक्ष त्याकडे कसे गेले नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उभारणे आवश्यक असले, तरी विकासकामांदरम्यान अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.

राडारोडा हटवून वृक्षाला जीवदान द्या!

या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने तातडीने पाहणी करून वृक्षाच्या बुंध्याशी टाकलेला राडारोडा, रेती आणि खडीचे ढिगारे हटवावेत. तसेच, या प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी भूपेश कदम यांनी केली आहे.वृक्षाच्या बुंध्याभोवती पुरेशी मोकळी जागा ठेवून योग्य आकाराचे आळे तयार करावे आणि त्याची नियमित निगा राखावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. स्थानकाचा विकास करताना जुन्या वृक्षांचे संरक्षण झाले, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच स्थानकाचे नैसर्गिक सौंदर्यही टिकून राहू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबारानंतर वर्षा गायकवाड यांची राज्य सरकावर टीका

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT