मुंबई

मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या

CD

मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या
ठाणे, ता. १८ : मोबाईल परत मागितल्यावरून झालेल्या वादातून चौघांनी केलेल्या मारहाणीत ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अवघ्या तासाभरात चार संशयितांना ताब्यात घेतले. इलियास नियाझ अहमद कुरेशी ऊर्फ सलीम असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (ता. १३) रात्री रेल्वे रुळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर काही व्यक्तींमध्ये भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सलीम यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात सलीम यांनी दोन दिवसांपूर्वी परमेश्वर अंडागळे यांचा मोबाईल घेतल्याचे समोर आले. मोबाईल परत मागण्यासाठी परमेश्वरसह अन्य तिघे सलीम यांच्याकडे गेले होते. सलीम यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने वाद झाला. त्यानंतर चौघांनी संगनमताने लाकडी दांडका, कमरेचा पट्टा आणि पाइपने सलीम यांना मारहाण केली. गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी परमेश्वर अंडागळे, मोहम्मद फिरोज हनीफ खान ऊर्फ कब्बू तसेच अनिल निवृत्ती चौरे आणि सुनील भाऊसाहेब पगारे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले. मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : Tiger Shroff Firing Live : टायगर श्रॉफवरील गोळीबाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; पोलीस आयुक्तांशी चर्चा करत कठोर कारवाईचे आदेश

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT