सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : घोडबंदर मार्गावरील कावेसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चौक विकसित केला असून, तेथे महाराजांचा जिरेटोप उभारण्यात आला आहे. सुशोभीकरणामुळे चौकाला नवे रूप मिळाले असून, शनिवारी (ता. १७) खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते या चौकाचे लोकार्पण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून तसेच विशेष निधीतून ठाणे महापालिकेने हे काम केले आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला सभागृह नेते हणमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका कमल चौधरी, अर्चना मणेरा, विक्रांत तांडेल यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच त्यांच्या विचारांतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौकाची उभारणी केल्याचे म्हस्के यांनी सांगितले. कार्यक्रमात नेहा देवळे आणि प्रसाद देवळे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेल्या आरतीचे गायन केले. शर्वरी जगताप, शरयू जगताप आणि शर्वी घाटे यांनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या सादरीकरणाचे म्हस्के यांनी कौतुक केले. चौकाच्या कामात योगदान दिल्याबद्दल महापालिकेचे उपअभियंता रोहित गुप्ता, कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर आणि अभय मिलखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.