गंजाडच्या जिल्हा परिषद शाळेला सुसज्ज नवी वास्तू
मुंबई मिरर राउंड टेबल २००च्या सहकार्याने इमारतीचे लोकार्पण
कासा, ता. १८ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षणासाठी आधुनिक आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, या उद्देशाने गंजाड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला सुसज्ज नवी वास्तू उपलब्ध झाली आहे. मुंबई मिरर राउंड टेबल २००च्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या नूतन इमारतीचे लोकार्पण रविवारी (दि. १८) उत्साहात पार पडले. या नव्या वास्तूमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ मिळणार असून, ग्रामीण शिक्षणाच्या विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबई मिरर राउंड टेबल २००ने सामाजिक उत्तरदायित्वातून योगदान दिले. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल मुंबई मिरर राउंड टेबल २००चे आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक शंकर आमटे यांनी सूत्रसंचालन केले. नूतन इमारतीमुळे गंजाडमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.