मुंबई

ईडीच्या ताब्यातील सदनिकेचे कुलूप तोडून प्रवेश

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त करून प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या घोडबंदर रोडवरील कावेसर येथील सदनिकेत कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरेश कांबळे यांनी सदनिकेचा बेकायदा ताबा घेतल्याचा आरोप ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला असून, याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कावेसर येथील पोलिस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारत क्रमांक एकमधील चौथ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक ४०५ ही मालमत्ता मुमताज अझाज शेख ऊर्फ राजू यांच्या नावावर आहे. कासारवडवली पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान २०२२ मध्ये सदनिका तात्पुरती जप्त करण्यात आली. त्यानंतर १७ डिसेंबर २०२४ ला ईडीने सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा घेतला. ईडीच्या तक्रारीनुसार, सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने १६ जुलैला ई-मेलद्वारे सदनिकेत अनधिकृत प्रवेश झाल्याची माहिती दिली. बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी असल्याचे सांगणारे आकाश ठोंबरे हे चावी बनविणाऱ्या व्यक्तीसह सदनिकेत आले होते. हरेश कांबळे यांच्या सांगण्यावरून सदनिकेचे कुलूप उघडण्यात आल्याचे सोसायटीने कळविल्याचे ईडीने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर कांबळे यांनी सदनिकेचे कायदेशीर मालक असल्याचा दावा केला. ईडीने लावलेली ताबा नोटीस काढणे, जुन्या कुलपाऐवजी नवीन कुलूप बसविणे आणि सदनिकेचा अनधिकृत ताबा घेणे, असा प्रकार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबरला पोलिस बंदोबस्तात सदनिकेला भेट देत दोन पंचांच्या उपस्थितीत मुख्य दरवाजाचे कुलूप बदलून मालमत्ता जप्तीची नोटीस पुन्हा लावली. संबंधित मालमत्तेबाबत मुंबईतील विशेष न्यायालयात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कार्यवाही प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत मालमत्तेच्या ताब्यात हस्तक्षेप झाल्याने न्यायालयीन कार्यवाहीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ईडीच्या तक्रारीनुसार कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कासारवडवली पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT