जितेंद्र आव्हाड यांना गोळ्या घालण्याची धमकी
अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना गोळ्या घालण्याची धमकी मोबाईल फोनवरून देण्यात आली. याप्रकरणी पक्षाचे ठाणे जिल्हा सेक्रेटरी हेमंत वाणी यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार रविवारी (ता. १८) दुपारी ३च्या सुमारास हेमंत वाणी हे आमदार आव्हाड यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी बसले होते. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने आव्हाड यांच्या मोबाईलवर संपर्क साधून धमकी दिली. त्यानंतर आलेल्या फोनवर वाणी यांनी विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने आपण आव्हाड यांच्याशी नव्हे; तर ‘जित्या’ याच्याशी बोलण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असल्याने आत प्रवेश मिळाला नसल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले. त्याला आत येण्यास सांगितल्यानंतर, ‘त्याला तीन गोळ्या घालतो आणि मग तुला गोळी घालतो,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आमदार आव्हाड यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप संदेश पाठवला. या प्रकारानंतर हेमंत वाणी यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.