कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली ७९वा वार्षिक निरंकारी संत समागम २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळावर होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे २० हजार सेवादार पूर्वतयारीच्या कामात सहभागी झाले आहेत.
देश-विदेशातील हजारो श्रद्धाळू या समागमाला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भव्य मंडप, विविध सुविधा आणि आधुनिक प्रकाशचित्र पडद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या पडद्यांमुळे समागमस्थळाच्या विविध भागांत बसलेल्या श्रद्धाळूंना प्रवचने, भजने आणि आध्यात्मिक विचारांचा अनुभव घेता येणार आहे. सेवादारांच्या निःस्वार्थ सेवा, परिश्रम आणि समर्पणातून समागमस्थळाला आध्यात्मिक नगरीचे स्वरूप प्राप्त होत आहे.
हा संत समागम केवळ वार्षिक धार्मिक सोहळा नसून ब्रह्मज्ञान, भक्ती, समर्पण आणि आत्मिक जागृतीचा संगम मानला जातो. विश्वबंधुत्व, सौहार्द, प्रेम आणि निःस्वार्थ सेवा ही मानवी मूल्ये जीवनात रुजविण्याची प्रेरणा या माध्यमातून दिली जाते.
आकर्षक स्वागतद्वार
समागमस्थळी उभारण्यात आलेले भव्य स्वागतद्वार विशेष आकर्षण ठरत आहे. त्याची कलात्मक रचना आणि भव्यता सेवाभाव, सृजनशीलता, सामूहिक श्रद्धा आणि समर्पणाचे दर्शन घडवते. श्रद्धाळूंच्या सहभागातून साकारलेल्या या स्वागतद्वारातून प्रत्येक आगंतुकाचे प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत करण्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.