दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी
अकॅडमीच्या पाच जणांवर गुन्हा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी विनर्स अकॅडमीच्या संस्थापक शिक्षकासह पाच जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहलीचे योग्य नियोजन न केल्याने निष्काळजीमुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मृत विद्यार्थी राजवीर वाहिले यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला.
आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील विनर्स अकॅडमीचे संस्थापक शिक्षक अमर आडक, मृणाल नरसखेडे, सबा महबूब इनामदार, शिल्पा अमर आडक आणि वैष्णवी मृणाल नरसखेडे यांच्याविरुद्ध १८ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष आवटी तपास करीत आहेत. तक्रारीतील आरोपांच्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विनर्स अकॅडमीच्या अकरावीतील विद्यार्थ्यांना रायगड किल्ला आणि श्रीवर्धन परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर सहलीसाठी नेण्यात आले होते, मात्र सहलीचे पूर्वनियोजन योग्य प्रकारे करण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. रायगड किल्ल्यावरील रोप वे बंद असतानाही रोप वेच्या तिकिटाचे पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पायरी मार्गाने नेण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना श्रीवर्धन समुद्रकिनारी न नेता दिवेआगर येथील कमी वर्दळीच्या ठिकाणी नेण्यात आले. या विद्यार्थ्यांना पोहता येत नाही, याची माहिती या शिक्षकांना होती तरीही त्यांनी नियोजनात हलगर्जीपणा केल्याने ही घटना घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.