दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदीला झळाळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : दसऱ्याच्या मुहूर्तावर आज सोन्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असतानाही मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी नाणी, दागिने आणि लग्नसराईसाठीच्या खरेदीला पसंती दिली. देशात अंदाजे १६ ते १७ टन सोन्याची खरेदी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील उपलब्ध दरांनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला सुमारे एक लाख ४८ हजार ५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे एक लाख ३५ हजार ७१० रुपये होता. प्रत्यक्ष दर शहर, सराफा बाजार आणि शुद्धतेनुसार बदलू शकतात. दागिन्यांच्या अंतिम किमतीत घडणावळ आणि लागू करांची भर पडते. यंदा सोन्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा कायम आहे. ग्राहकांकडून आपल्या बजेटनुसार एक-दोन ग्रॅमपासून सोन्याची खरेदी केली गेली. छोट्या वजनाच्या नाण्यांना तसेच हलक्या वजनाच्या मंगळसूत्र, कानातील टॉप्स आणि दैनंदिन वापरातील दागिन्यांना मागणी होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात झालेली गर्दी पाहता, सणासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीचा उत्साह कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.