मुंबई

मॉडेला ते तीन हात नाका मार्गावर लवकरच धावणार मेट्रो

CD

तीन हात नाका मार्गावर
लवकरच धावणार मेट्रो
मेट्रोचे डबे रुळांवर चढविण्याचे काम सुरू होणार; वाहतुकीत बदल

ठाणे शहर, ता. २० (बातमीदार) : तीन वर्षांच्या विलंबानंतर ठाण्यातील मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. मुलुंड येथील मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका या मार्गावरील मेट्रोच्या रुळांवर डबे चढविण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी बुधवारी (ता. २१) मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कामामुळे मेट्रो प्रकल्पाच्या एका टप्प्यातील सेवा डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईतील वडाळा ते घाटकोपर आणि पुढे ठाण्यापर्यंतचा हा महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. कामाला तीन वर्षांचा विलंब झाला असला, तरी आता प्रकल्पाने अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू केली आहे. मेट्रो मार्गावर रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, आता त्यावर डबे चढविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.

घोडबंदर मार्गावरील कासारवडवली येथे काही महिन्यांपूर्वी मेट्रोची चाचणी घेण्यात आली होती. आता मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका या मार्गावरील रुळांवरही मेट्रोचे डबे चढविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरपर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता आहे.
मेट्रो-४च्या कामासाठी ठाणे वाहतूक विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका या मार्गावरील काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचा प्रवास पुढे कासारवडवलीपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ठाणेकरांचा मुंबईला जाण्या-येण्याचा प्रवास अधिक जलद होण्यास मदत होईल. शहरातील लाखो प्रवाशांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे.
वाहतुकीतील बदल रात्रीच्या वेळेत लागू होणार असल्याने त्याचा वाहतुकीवर विशेष परिणाम होणार नसल्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले.

असे आहेत वाहतुकीतील बदल

वाहतूक बंद : मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग : ही वाहतूक विरुद्ध दिशेच्या मार्गावरून वळविण्यात येईल.
वेळ : मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Car Firing : टायगर श्रॉफ प्रकरणात नवा ट्विस्ट, राधा अन् बबिता दिल्लीहून मुंबईला आल्या अन्...

Karad Kolhapur Naka Flyover Accident : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलावर काळाचा घाला! चौघांचा जागीच मृत्यू; तिघेजण जखमी, मागून ट्रकला स्कार्पिओची जोरदार धडक

Arabian Sea Low Pressure Area : नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा येलो अलर्ट

Supreme Court : २२ वर्षे खटला चालला, तरी आरोपी तुरुंगाबाहेर! सर्वोच्च न्यायालय हायकोर्टावर संतापले; आता थेट आत्मसमर्पणाचे आदेश!

Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT