मुंबई

प्रा. सुधाकर नाडकर्णी यांचे निधन

CD

प्रा. सुधाकर नाडकर्णी यांचे निधन
मुंबई, ता. २० : डिझाइन शिक्षणाला नवी दिशा देणारे ज्येष्ठ प्राध्यापक सुधाकर नाडकर्णी यांचे मंगळवारी (ता. २०) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने डिझाइन क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रा. नाडकर्णी यांनी भारतात डिझाइन शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे काम केले. १९६९ मध्ये त्यांनी आयआयटी मुंबईतील औद्योगिक डिझाइन केंद्राच्या उभारणीत योगदान दिले. १९९७ मध्ये आयआयटी गुवाहाटी येथे डिझाइन विभाग सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबईतील वेलिंगकर व्यवस्थापन संस्थेत ‘बिझनेस डिझाइन’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. डिझाइन हा केवळ अभियांत्रिकीचा भाग नसून, स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, हा विचार त्यांनी रुजवला. पर्यावरण, प्रदर्शन आणि उत्पादन डिझाइन या क्षेत्रांतही त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘डिझाइन थिंकिंग’ ही संकल्पना व्यवस्थापन शिक्षणाशी जोडली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवनिर्मिती आणि उद्योजकतेची दिशा मिळाली. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित विचार मांडणे, ही त्यांच्या कामाची खासियत होती. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही ते उत्साहाने कार्यरत होते. प्रा. नाडकर्णी यांच्यावर मंगळवारी सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी उल्काताई, मुलगी सुहिता, मुले आदित्य आणि नंदन, तसेच नातलग, सहकारी आणि विद्यार्थ्यांचा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Car Firing : टायगर श्रॉफ प्रकरणात नवा ट्विस्ट, राधा अन् बबिता दिल्लीहून मुंबईला आल्या अन्...

Karad Kolhapur Naka Flyover Accident : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलावर काळाचा घाला! चौघांचा जागीच मृत्यू; तिघेजण जखमी, मागून ट्रकला स्कार्पिओची जोरदार धडक

Arabian Sea Low Pressure Area : नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा येलो अलर्ट

Supreme Court : २२ वर्षे खटला चालला, तरी आरोपी तुरुंगाबाहेर! सर्वोच्च न्यायालय हायकोर्टावर संतापले; आता थेट आत्मसमर्पणाचे आदेश!

Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT