मुंबई

मार्को रुबिओंना भारताकडून जादा ऊर्जा व्यापाराची अपेक्षा

CD

जादा ऊर्जा व्यापाराची रुबिओंना अपेक्षा
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा

मुंबई, ता. २० : भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांत काही मतभेद असले तरीही ऊर्जा व्यापार आणि संरक्षण सहकार्य यांच्यात वाढ करण्याचा निर्धार आज अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यातील चर्चेदरम्यान आज येथे व्यक्त करण्यात आला. हा व्यापार वाढला तर भारताच्या ऊर्जापुरवठा साखळीत विविधता येईल, असेही रुबिओ म्हणाले.
गेल्या पाच महिन्यांत दुसऱ्यांदा भारत भेटीवर आलेल्या रुबिओ यांचे येथे जयशंकर यांनी स्वागत केले. व्यापार तंत्रज्ञान संरक्षण ऊर्जा या क्षेत्रात सहकार्य वाढीस लागावे, अशी आम्हा दोघांची इच्छा असल्याचे जयशंकर यांनी समाजमाध्यमांवर लिहिले आहे. तर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पश्चिम आशियातील घडामोडींसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताला आपली ऊर्जाविषयक वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेबरोबर ऊर्जा व्यापार वाढवला पाहिजे, असेही रुबिओ म्हणाले. नुकतेच या दोन्ही देशांनी संरक्षण आणि नागरी अणू सहकार्य या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचेही त्यांनी कौतुक केले. भारताने अमेरिकेकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा खरेदी केल्यास त्यामुळे दोन्ही देशांची सुरक्षा आणि प्रगती यांना हातभार लागेल, असेही ते म्हणाले.
चर्चेपूर्वी रुबियो यांनी २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ताज स्मृतिस्तंभासमोर पुष्पचक्र वाहिले. या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांसह सुमारे १६० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. ऊर्जा व्यापार आणि तेल शुद्धीकरण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी रोमिओ हे जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेलाशुद्धीकरण प्रकल्पालाही बुधवारी भेट देणार आहेत.
कच्च्या तेलाचा वापर करण्यापूर्वी ते शुद्ध करणे आवश्यक आहे. भारताकडे जामनगरला अवाढव्य अशी तेलशुद्धीकरण कंपनी आहे. यात काही राष्ट्रांचा संबंध असल्यामुळे तेथे चर्चा करणे आवश्यक असल्याचेही रुबिओ म्हणाले. भारताने रशियाकडून कच्चे तेल घेण्याबाबत ते म्हणाले, की हा प्रश्न रशियाच्या कच्च्या तेलाचा नसून, भारताला विविध मार्गांनी कच्चे तेल मिळण्याबाबतचा आहे आणि आम्हीदेखील काही प्रमाणात तो पुरवठा करू शकतो. याबाबत व्हेनेझुएला आणि इतर देशांशीही चर्चा झाली आहे. यासाठी अनेक मित्रदेश आपल्यासोबत असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले
...
व्यापार करार लवकरच
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार अंतिम होणे जवळपास निश्चित झाल्याचेही रुबिओ यांनी नुकतेच उजबेकीस्थानमध्ये म्हटले होते. हा करार पूर्ण करण्यात आता केवळ काही बाबींचा समावेश उरला आहे. त्यामुळे हा करार लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच याबाबत गुड न्यूज येईल, असेही ते म्हणाले. रशियाकडून कच्चे तेल घेणाऱ्या देशांवरील आयात कर रद्द करण्याचा निर्णयही याच्याशी संबंधित असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT