घाटकोपरमध्ये निःशुल्क पशु शस्त्रक्रिया शिबिर
आमदार पराग शाह, महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन
घाटकोपर ता. २१ (बातमीदार) ः प्राणीमात्रांप्रती करुणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव जपत गरजू पशूंना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने घाटकोपर पूर्व येथे भव्य निःशुल्क पशु शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेब यांच्या प्रेरणेने अरहम ग्रुप–अरहम अल्वेज केअर यांच्या वतीने आयोजित या शिबिराची सुरुवात बुधवारी (ता. २१) मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार पराग शाह यांच्या हस्ते करण्यात आली.
घाटकोपर पूर्व येथील आराध्या भक्ती पार्क, पोलिस हॉकी ग्राउंड येथे २१ व २२ ऑक्टोबरदरम्यान हे शिबिर सुरू राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमातून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या पशुंना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून पशुंची आरोग्य तपासणी, आवश्यक शस्त्रक्रिया आणि विविध आजारांवरील उपचार पूर्णतः निःशुल्क करण्यात येणार आहेत. तसेच शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असलेल्या पुढील उपचारांची व्यवस्था केली जाणार असून, गरजेनुसार पशुंच्या निवासासह चारा आणि पाण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे आपल्या पशुंवर उपचार करणे शक्य न होणाऱ्या पशुपालकांना या शिबिराचा मोठा आधार मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.