बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : पश्चिमेतील रमेशवाडी परिसरात गणेश यादव (वय ३०) याची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर कुमार (वय २७) असे त्याचे नाव असून, सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तो हत्येपूर्वी प्रमुख आरोपी संदीप सिंग याच्यासोबत दुचाकीवरून घटनास्थळाच्या परिसरात रेकी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे हत्येच्या कटातील आरोपींच्या भूमिकांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी अवनीश सिंग आणि संदीप सिंग या दोघांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते. सुरुवातीच्या तपासात ज्ञानेश्वरचा सहभाग स्पष्ट झाला नव्हता. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची पुन्हा तपासणी केली असता, संदीप सिंग याच्यासोबत ज्ञानेश्वर दुचाकीवरून घटनास्थळाच्या परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. या धाग्याच्या आधारे बदलापूर पश्चिम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हत्येच्या कटात सहभागी असल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेश गज्जल यांनी ज्ञानेश्वरला बदलापूर पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळविण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.