मुंबई

दारूच्या नशेत आव्हाडांना धमकी; चौकशीनंतर नोटीस देऊन सोडले

CD

दारूच्या नशेत आव्हाडांना धमकी;
चौकशीनंतर नोटीस देऊन सोडले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला पुणे पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी चौकशी केल्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडण्यात आले. या वेळी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याबाबत त्याला सूचना देण्यात आली आहे. दारूच्या नशेत आपण हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.
आमदार डॉ. आव्हाड यांना रविवारी दुपारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. धमकी दिल्यानंतर तो पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार ठाणे पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले होते. संबंधित तरुण हा सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून काम करीत असून, लोणीकंद परिसरात भाड्याच्या घरात राहतो. डॉ. आव्हाड यांना धमकी दिल्याची बातमी वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर त्याच्या घरमालकाने ती पाहिली. त्यानंतर घरमालकाने तातडीने लोणीकंद पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT