मुंबई

एसआयआर काम , विद्यार्थी शिक्षणासाठी थांब

CD

गुरुजनांवर कामांचे ओझे
वसईतील जिल्हा परिषद शाळांची अवस्थी, विद्यार्थ्यांची परवड
वसई, ता.२२ (बातमीदार)ः आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने शाळा उभारल्या आहेत. परंतु, ज्ञानदानाएेवजी गुरुजनांवर अतिरिक्त कामांचे ओझे असल्याने विद्यार्थ्यांची परवड होत आहे.
वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पालघर जिल्ह्यात २,११२ शाळा आहेत. यापैकी सर्वाधिक ८५७ शाळा वसई तालुक्यात आहेत. मात्र, अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये त्रृटी असल्याने अडचणी उद्भवत आहेत. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या व्यवस्थेसाठी काही सामाजिक संस्थांकडून मदत केली जात आहे. तर डिजिटल शिक्षणाचा प्रचाराने उत्साह निर्माण झाला असली तरी अनेक ठिकाणी इंटरनेट, संगणकांच्या अभावामुळे शिक्षणात अडसर निर्माण होत आहे.
-------------------
खासगी शाळांकडे कल
खासगी शाळांचे शुल्क, प्रवास व अन्य खर्च आवाक्याबाहेर असल्याने एकीकडे मोफत शिक्षणासाठी पालक वर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतात, मात्र, शाळांची झालेली दुरवस्था, शिक्षकांचा अभावामुळे खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे.
------------------
दर्जेदार शिक्षणाचा अभाव
वसई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत असले तरी खासगी शाळांच्या तुलनेत सुविधांचा अभाव आहे. एकीकडे सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षणाचा दावा केला जातो. पण दुसरीकडे पालकांना मुलांच्या शिकवणीसाठी वर्षाला ३५ हजार ते १ लाखांचा अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागत आहे.
----------
शिक्षकांची दमछाक
गेल्या पाच महिन्यांपूर्वी मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कामांमुळे शिक्षक व्यग्र झाले आहेत. एक शिक्षक केवळ ६८ दिवस शाळेत हजर राहिला आहे. त्यामुळे अध्यापनाची व्यवस्था डळमळीत झाली असून अभ्यासक्रम पूर्ण करताना शिक्षकांची दमछाक होत आहे.
--------
खासगी शिकवणीवर भिस्त
शाळांमधील सुविधा, शिक्षकांच्या कमतरतेमुळे प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना असुविधा निर्माण होतात. शिक्षणाचा अधिकार अंतर्गत मुलांना मोफत शिक्षण मिळत असले, तरी दर्जेदार अभ्यासासाठी पालकांना खासगी शिकवणी लावणे भाग पडते. यासाठीचा अतिरिक्त खर्च पालकांच्या खिशावर पडत आहे.
-----------
हस्तांतरण प्रक्रिया कागदावर
जिल्हा परिषद शाळा, वसई-विरार शहर पालिकेकडे हस्तांतरित करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला शाळा विकसित करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे हस्तांतरण झाले तर शाळांना अत्याधुनिक सुविधा देणे सोईचे होणार आहे.
-----------
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून वाचन, लेखन उपक्रमासह निपुण पालघर कार्यक्रम जिल्हाभर राबवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक, शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे
- सोनाली मातेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघर
---------
पालघर जिल्हा
शाळा विद्यार्थी शिक्षक
३,३०० ७,५६,००७ २१,५२४
----------------------
वसई तालुका
शाळा विद्यार्थी शिक्षक
८५७ ३,८९,४५० १०,६१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा ३० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत पार, तीन महत्त्वाचे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले; कसे आहेत मार्ग?

IND vs NZ 1st T20I: क्रिकेटपटू फुटबॉलचा सराव का करतात? अर्शदीप सिंगने घेतलेली विकेट पाहून मिळेल उत्तर... Video Viral

घरात घुसून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, धारधार शस्त्राने वार अन् गोळीबार; घटनेनंतर २ गटात वाद, ६ जण जखमी

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

Donald Trump: अमेरिकेत घोंघावतेय 'निळे वादळ'? राजकारणात मोठी उलथापालथ होणार

SCROLL FOR NEXT