मुंबई

अनगावात एकाच इमारतीत दोन घरफोड्या

CD

अनगावात एकाच इमारतीत दोन घरफोड्या
दागिने आणि रोख रक्कम चोरीला
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : तालुक्यातील अनगाव परिसरातील गणेश रेसिडेन्सीच्या सी विंगमध्ये चोरट्यांनी एकाच इमारतीतील दोन फ्लॅट फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पहिल्या घटनेत दीपेश अरुण कासार हे नातेवाइकांकडे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकर फोडला. त्यातून सोन्याची नथ, पेंडल, तीन अंगठ्या, मुलींचे कानातील दागिने, बाजूबंद, सहा चांदीच्या साखळ्या, चांदीचे कडे आणि अन्य दागिने चोरीला गेले.

दुसऱ्या घटनेत याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील राजू गोविंद शेलार यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. शेलार कुटुंबीय गावी देवीच्या कार्यक्रमासाठी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकर फोडला. त्यातून ५८ हजार रुपये रोख, कानातील दागिने, महिलांची अंगठी, चांदीचे जोडवे आणि मुलींच्या बचतीचे डबे चोरून नेले. एकाच इमारतीत दोन घरफोड्या झाल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन्ही घटनांचा तपास गणेशपुरी पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT