उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : दोन वर्षांहून अधिक काळ रिकामी असलेली धोकादायक इमारत आता शेजाऱ्यांच्या जीवावर उठली आहे. उल्हासनगर कॅम्प चारमधील हरनाम अपार्टमेंटच्या प्लास्टरसह स्लॅबचे तुकडे कोसळून शेजारील घराचे छप्पर तुटले. यात जीवितहानी टळली असली, तरी रहिवाशांमध्ये भीती वाढली आहे. इमारत पाडण्यासाठी पत्र देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हरनाम अपार्टमेंट या धोकादायक इमारतीच्या प्लास्टर आणि स्लॅबचे भाग कोसळून शेजारील घराच्या छपराचे नुकसान झाले. बॅरेक क्रमांक १४८९ येथे राहणाऱ्या मनीष पंजाबी यांच्या घराशेजारी ही इमारत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन वर्षांहून अधिक काळापासून इमारत रिकामी असून तिची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. वारंवार प्लास्टर आणि स्लॅबचे तुकडे कोसळत असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत मनीष पंजाबी यांच्या घरावर ढिगारा पडल्याने छप्पर तुटले. सामाजिक कार्यकर्ते परमानंद गरेजा यांनी सांगितले की, इमारत पाडण्याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाला यापूर्वीच पत्र दिले आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई झाली नाही. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने इमारत जमीनदोस्त करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.