मुंबई

काँग्रेस शहराध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी?

CD

अंबरनाथ, ता. २३ (वार्ताहर) : ‘काँग्रेसवाल्यांनी भाजपच्या वॉर्डात येऊ नये,’ असे म्हणत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष यासीन अकबर शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पालेगाव परिसरात घडला. या वेळी तलवार काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला; तसेच रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा दावा शेख यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेख यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.
शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पालेगाव येथील महाराज चाय येथे चहा पीत असताना फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या त्यांच्या ओळखीच्या शिवनाथ पाटील ऊर्फ बाबू याने त्यांच्याशी वाद घातला. ‘पालेगावात आम्हीच बॉस आहोत. काँग्रेसवाल्यांनी भाजपच्या वॉर्डात येऊ नये,’ असे म्हणत त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. वादादरम्यान संबंधित व्यक्तीने तलवार काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. त्यानंतर वाहनात रिव्हॉल्व्हर असल्याचे सांगत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचाही आरोप त्यांनी केला. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही चित्रणात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता संबंधित व्यक्ती वाहनासह तेथून निघून गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT