मुंबई

जव्हारमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

CD

जव्हारमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

नगर परिषदेकडून ठोस उपाययोजनांची मागणी

जव्हार, ता. २३ (बातमीदार) : जव्हार शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील गल्लीबोळ, बाजारपेठा, वसाहती आणि शाळांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

घोरवाडी, गोरवाडी, मोर्चा, जांभूळ विहीर, पाचबत्ती, सोनार आळी, गांधी चौक, मुकणे कॉलनी, अंबिका चौक, तारपा चौक आणि हनुमान पॉईंट या परिसरांत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुत्र्यांनी अंगावर धावून जाणे आणि रात्रीच्या वेळी सतत भुंकणे,अशा प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी
“जव्हार शहरात मोकाट कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांनी अंगावर धावून जाणे, चावणे आणि दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत. नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज मुकणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

IND W vs ZIM W: प्रतिका रावलचं शतक अन् शेफाली वर्माची वादळी खेळी! झिम्बाब्वेला लोळवत भारतीय महिलांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

Piyush Goyal : जर्मनीतील भारतीयांनी भारतातील तरुणांच्या कौशल्याला संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT