मुंबई

मैदानांवर व्यावसायिक कार्यक्रमांचा कब्जा

CD

मैदानांवर व्यावसायिक कार्यक्रमांचा कब्जा
स्थानिक खेळाडूंच्या सरावासाठी वेळ राखण्याची मागणी
जुईनगर, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबईतील सार्वजनिक मैदानांवर मोठ्या व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन होत असताना स्थानिक युवकांना खेळण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याचा आरोप होत आहे. नेरूळमधील झोटिंगदेव-बामनदेव मैदान गेल्या तीन वर्षांपासून फॉर्म्युला-४ रेसिंगसाठी वापरले जात असल्याने स्थानिक खेळाडूंच्या सरावाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवरात्रीनंतर गरबा महोत्सवांसाठीही मैदान उपलब्ध करून दिले जात असल्याने क्रिकेट, फुटबॉलसह अन्य खेळ खेळायचे कुठे, असा सवाल युवकांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक मैदानांचा मूळ उद्देश नागरिकांना खेळ, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे, मात्र व्यावसायिक कार्यक्रमांमुळे स्थानिक खेळाडूंना नियमित सरावाची संधी मिळत नसेल, तर मैदानांच्या वापराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने मैदानांच्या वापराबाबत पारदर्शक धोरण तयार करावे, अशी मागणी होत आहे.

समान संधी देण्याची गरज
मैदानांवर मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देताना स्थानिक युवकांसाठी ठरावीक वेळ राखून ठेवावा. शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांवरील टर्फच्या वापराबाबत लागू असलेल्या न्यायालयीन आदेशांचीही अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मैदानांचा प्रश्न कोणत्याही समाजाच्या विरोधाचा नसून सार्वजनिक सुविधांचा समान वापर आणि स्थानिक खेळाडूंना संधी मिळण्याचा आहे. त्यामुळे व्यावसायिक कार्यक्रम आणि युवकांच्या क्रीडाविषयक गरजा यांच्यात समतोल राखणे आवश्यक आहे.

कोट
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात होणाऱ्या फॉर्मुला ४ रेससाठी झोटिंगदेव बामनदेव मैदान याचा वापर होणार आहे ही रेस फक्त वर्षातून एकवेळ होणार आहे असे तीन वर्ष रेस होईल परंतु स्थानिक युवक हे या रेस मुळे मैदानी खेळापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी मोकळ्या जागेत बांधलेले टर्फ खोलून युवकांना मैदाने खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत ही पालिका प्रशासनाला विनंती.
- सोमनाथ म्हात्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT