सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : दिवा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना साध्या वेशातील महिला पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.
दिवा पूर्व येथे राहणाऱ्या कविता कटके (४०) या बुधवारी घरकामासाठी सायन येथे जाण्याकरिता दिवा रेल्वे स्थानकात आल्या होत्या. सीएसएमटी धीम्या लोकलच्या मोटरमनच्या बाजूकडील पहिल्या महिला डब्यात त्या चढताना दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या साध्या वेशातील महिला पोलिस अंमलदार फाळके, सुर्वे आणि राऊळ यांनी प्रसंगावधान राखत दोन्ही महिलांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडले. त्यानंतर त्यांना ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशी केली असता, पकडलेल्या महिला मेधिता काळे (२२) आणि अनु काळे (३५) या दोघीही पुण्यातील येरवडा येथील रहिवासी आहेत. ७.४९० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्राची किंमत एक लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.