मुंबई

ठाणे जिल्ह्यातील ४.३४ लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

CD

मुरबाड, ता. २३ (बातमीदार) : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मंगळवारी (ता. २७) ठाणे जिल्ह्यातील चार लाख ३४ हजारांहून अधिक बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी तसेच रक्तक्षय, अशक्तपणा आणि कुपोषणाचा धोका कमी व्हावा, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका आणि शिक्षक यांच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी सात लाख ४० हजार जंतनाशक गोळ्यांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

जंतसंसर्गामुळे वाढीवर परिणाम
जंतसंसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय, अशक्तपणा, भूक मंदावणे आणि पोषणातील कमतरता निर्माण होऊ शकते. याचा परिणाम शारीरिक वाढ, एकाग्रता आणि बौद्धिक विकासावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार पात्र बालकांना जंतनाशक औषध देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणेही महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

स्वच्छता ठेवा
पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या पाल्यांना जंतनाशक औषध द्यावे. बालकांनी नियमित हात धुणे, नखे स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि स्वच्छ पाणी पिणे या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

३ नोव्हेंबरला पूरक दिन
काही कारणांमुळे २७ ऑक्टोबरला अनुपस्थित राहिलेल्या पात्र बालकांनाही जंतनाशक औषधाचा लाभ मिळावा, यासाठी मंगळवारी, ३ नोव्हेंबरला पूरक दिन घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT