मुंबई

फणसाड अभयारण्यात शिकारीसाठी आलेले दोघे जेरबंद!

CD

फणसाड अभयारण्यात शिकारीसाठी आलेले दोघे जेरबंद!
दोन रायफलींसह १०४ जिवंत काडतुसे आणि वन्यप्राण्यांचे मांस जप्त; ५.३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य परिसरातील टक्का आदिवासीवाडी येथील जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या मुंबईतील दोन व्यक्तींना मुरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख ३२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अभयारण्य परिसरातील वन्यजीवांच्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिकारीच्या उद्देशाने काहीजण रात्रीचे अभायरण्यात फिरत होते. ही बाब रोहा वन विभाग, फणसाड वन्यजीव विभागाला नागरिकांनी निदर्शनात आणून दिली होती. यानुसार, शनिवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास मुरूड पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना टक्का आदिवासीवाडी परिसरातील जंगलातून एक चारचाकी संशयास्पदरीत्या जाताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, एका तरुणाच्या हातात रायफल आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी गाडीची सखोल तपासणी केली. यामध्ये एक सिंगल बॅरल रायफल, एक डबल बॅरल रायफल, एकूण १०४ जिवंत काडतुसे तसेच वन्यप्राण्यांचे मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारी साधने आढळली. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, त्यांची नावे क्रिशल डिमेलो (वय ५९) आणि राफेल डिमेलो (वय २३) अशी असून, ते मुंबईतील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. वन्यप्राण्यांची बेकायदा शिकार करण्याच्या उद्देशाने हे दोघे जंगलात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याकडून साहित्य जप्त केले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. मुरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तोफिक सय्यद करीत आहेत.


नागरिकांना आवाहन
जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करताना किंवा बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तातडीने मुरूड पोलिस ठाणे अथवा वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : नवी मुंबईत आकाराला येणार अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क'चा शुभारंभ!

SCROLL FOR NEXT