मुंबई

श्रमजीवी संघटनेच्या मोर्चामुळे जिल्ह्यात वाहतुकीत बदल -२७ ऑक्टोबरपासून वाहतूक निर्बंध

CD

श्रमजीवी संघटनेच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल
२७ ऑक्टोबरपासून मुंबई, गुजरातकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : श्रमजीवी संघटनेच्या वतीने २७ ऑक्टोबरला काढण्यात येणाऱ्या ‘संविधान हक्क संघर्ष मोर्चा’च्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मोर्चात एक लाखाहून अधिक आदिवासी सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध मार्गांवर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. हे निर्बंध २७ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजल्यापासून २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
२७ ऑक्टोबरला खारेगाव टोलनाका येथे मोर्चाचा मुक्काम असून, २८ ऑक्टोबरला मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस उपआयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना जारी केली आहे.
पर्यायी मार्गांवरही ठरावीक वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असतील. सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत अधिसूचनेत नमूद केलेल्या जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. पोलिस, अग्निशमन दल, ऑक्सिजन वाहतूक, जीवनावश्यक व नाशवंत वस्तू तसेच अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

नाशिककडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
मुंबई आणि नवी मुंबईकडून आनंदनगर चेकनाकामार्गे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना आनंदनगर येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनांनी ऐरोली, महापे, शिळफाटा, पत्रीपूल, दुर्गाडी आणि रांजनोली नाका या मार्गाचा वापर करावा.
मुंबई, विरार आणि वसईकडून घोडबंदरमार्गे नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना लोढा यू-टर्न येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनचालकांनी आनंदनगरमार्गे ऐरोली, महापे, शिळफाटा, पत्रीपूल, दुर्गाडी आणि रांजनोली नाका असा पर्यायी मार्ग स्वीकारावा. बेलापूर-ठाणे मार्गावरील विटावा जकात नाका येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच महापे-शिळफाटा मार्गावरील पूजा पंजाब हॉटेल आणि तळोजा-दहिसर मोरी-कल्याण फाटा मार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे ठाणे, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांना प्रतिबंध असेल.
नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनी पत्रीपूल आणि दुर्गाडीमार्गे प्रवास करावा. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महापे, माजिवडा वाय-जंक्शन आणि घोडबंदर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

मुंबई, नवी मुंबईकडे जाणाऱ्यांसाठीही निर्बंध
नवी मुंबई आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी आनंदनगर-ऐरोली मार्गाचा वापर करावा. चिंचोटी-मानकोली नाका येथे मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. वाडा रोडवरील नदी नाका-वडपामार्गे येणाऱ्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश करता येणार नाही. नाशिकहून मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांनाही रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी असेल.
मुरबाडहून मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांना दुर्गाडी येथे रोखण्यात येणार आहे. या वाहनांनी पत्रीपूल, शिळफाटा आणि महापेमार्गे पुढे जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT