मुंबई

कोपरखैरणेत क्षुल्लक वादातून रिक्षाचालकाची हत्या

CD

कोपरखैरणेत क्षुल्लक वादातून रिक्षाचालकाची हत्या
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : कोपरखैरणे सेक्टर तीनमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून रिक्षाचालक गणेश पारकर (५०) यांची बॅटने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
गणेश पारकर हे कोपरखैरणे सेक्टर तीनमध्ये कुटुंबासह राहत होते. ४ ऑक्टोबरला चिकणेश्वर गार्डनजवळ त्यांचे सावकार सावळे याच्याशी जुन्या वादातून भांडण झाले. या वेळी सावळे याने बॅटने पारकर यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर बाळू सावळे, सूरज गोडसे, विनय मालवणकर आणि इतरांनी त्यांना मारहाण केली. गंभीर जखमी पारकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र ७ ऑक्टोबरला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी हत्येचे कलम वाढवून तपास सुरू केला. मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे बाळू सावळे (४२), सूरज गोडसे (३०), विनय मालवणकर (३०) आणि सचिन गुरुलिंग वेळजरंगी (३७) यांना १५ ऑक्टोबरला सोलापूर येथून अटक करण्यात आली. पाच आरोपी पोलिस कोठडीत असून, अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT