मुंबई

निवडणूक आयोगाच्या नावाने सायबर टोळीने व्यावसायिकाला घातला ८.२१ लाखांचा गंडा

CD

निवडणूक आयोगाच्या नावाने लाखोंचा सायबर गंडा
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने मुलुंड येथील व्यावसायिकाला आठ लाख २१ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदार ओळखपत्र आणि ओळखपत्रावरील वडिलांच्या नावात तफावत असल्याचे सांगत बनावट व्हेरिफिकेशन लिंकद्वारे ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद वाडेल हे मुलुंड पश्चिम येथे राहण्यास असून, त्यांचे एपीएमसी मार्केटमध्ये पलक इंटिरियर्स नावाचे कार्यालय आहे. १३ ऑक्टोबरला ते आपल्या कार्यालयात असताना निवडणूक कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने त्यांना संपर्क साधला. तसेच, वाडेल यांच्या मतदार ओळखपत्रावरील आणि आधार कार्डावरील वडिलांच्या नावात फरक असल्याचे सांगितले. ही तफावत दूर करण्यासाठी एका लिंकद्वारे त्यांना कागदपत्रांची पडताळणी करण्यास भामट्याने सांगत रुपयांचा ऑनलाइन व्यवहार करण्यास सांगितले, मात्र हा व्यवहार अयशस्वी झाल्याने भामट्याने त्यांना दुसऱ्या क्रमांकावर फोन करण्यास सांगितले. या प्रक्रियेदरम्यान आरोपींनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवून वाडेल यांच्या बँकेच्या खात्यातून तब्बल आठ लाख २१ हजार ४४८ रुपये वळवून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाडेल पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांचे आवाहन
मतदार यादी पडताळणी, आधारशी संबंधित दुरुस्ती किंवा अन्य शासकीय प्रक्रियेच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करणे अथवा मोबाईलचा ताबा देणारे ॲप डाऊनलोड करणे टाळावे. कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या नावाने फोन आल्यास अधिकृत माध्यमातून खातरजमा करावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT