पुणे, ता. १४ : दिवाळीच्या पारंपरिक फराळाला व्यावसायिक स्वरूप देऊन घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणारी ‘दिवाळी फराळ व्यवसाय संधी’ कार्यशाळा १७ व १८ ऑक्टोबरला होणार आहे. घरगुती पद्धतीने चविष्ट व आकर्षक फराळ तयार करण्यासोबत त्याची विक्री करून उत्पन्नाचे साधन कसे निर्माण करावे, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. रवा व बेसन लाडू, चकली, चिरोटे, करंजी, पुडाची वडी, शेव, बाकरवडी, विविध प्रकारचे चिवडे, शंकरपाळे आणि बालुशाही यांसह लोकप्रिय फराळाचे पदार्थ प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहेत. तसेच पदार्थांची गुणवत्ता व चव वाढवण्याच्या टिप्स, उत्पादन नियोजन, व्यवसायाची सुरुवात आणि विक्रीसाठी आवश्यक बाबी समजावून सांगितल्या जातील. तयार पदार्थांच्या सविस्तर नोट्सही देण्यात येणार असून, महिला, गृहिणी, बचत गट आणि नवउद्योजकांसाठी ही कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल, तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. संपर्क : ८४८४८२२८५५
वेल्डिंग क्षेत्रात करिअरची संधी
औद्योगिक क्षेत्रात कुशल वेल्डिंग तंत्रज्ञांची गरज लक्षात घेऊन ‘बेसिक वेल्डिंग टेक्नॉलॉजी’ प्रशिक्षण तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून २६, २७ व २८ ऑक्टोबरला होणार आहे. वेल्डिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणे, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. प्रशिक्षणात एसएमएडब्ल्यू, टीआयजी आणि एमआयजी वेल्डिंग तंत्रांसोबत ऑक्सी-ॲसिटिलीन गॅस व प्लाझ्मा कटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. वेल्डिंग सिम्बॉल्स, वेल्डिंग प्रोसिजर स्पेसिफिकेशन यांची माहिती, तसेच विविध पोझिशन्समध्ये प्रत्यक्ष सराव करण्याची संधी देण्यात येणार आहे. सुरक्षित कामकाजासाठी आवश्यक नियम, वैयक्तिक संरक्षक साधनांचा वापर आणि वेल्डिंगदरम्यान घ्यावयाची खबरदारी यांवरही भर दिला जाणार आहे. उद्योगक्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरू शकतो. हे प्रशिक्षण तळेगाव-चाकण रोड, इंदुरी, तळेगाव दाभाडे, पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.