मुंबई

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा

CD

पुणे, ता. २२ : व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा २४ व २५ ऑक्टोबरला होणार आहे. शेतीसाठी उपलब्ध होत असलेली मर्यादित जमीन, पाण्याची टंचाई आणि रसायनमुक्त, दर्जेदार भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेता हायड्रोपोनिक्स हे आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञान म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. कमी जागेत, कमी पाण्याचा वापर करून वर्षभर उच्चदर्जाचा भाजीपाला उत्पादन घेण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होत आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती आदी विविध पिकांचे उत्पादन, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावीत, न्यूट्रिएंट सोल्युशन तयार करण्याची पद्धत, pH व EC नियंत्रण, प्रकाश, आर्द्रता आणि तापमानाचे व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

औषधी वनस्पती लागवड
ऑनलाइन कार्यशाळा

आयुर्वेदिक औषधे, हर्बल उत्पादने आणि नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांना वाढत्या मागणीमुळे औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीकडे शेतकरी आणि नवउद्योजकांचा कल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर २६, २७ व २८ ऑक्टोबरला औषधी वनस्पती लागवडीवरील तीनदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेत तुलसी, अश्वगंधा, शतावरी, लेमनग्रास, सिट्रोनेला आदी वनस्पतींची लागवड, योग्य प्रजातींची निवड, माती व हवामान, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, नर्सरी व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया, वाळवणी, साठवणूक व मूल्यवर्धन याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, बाजारपेठ, करारशेती, निर्यात संधी आणि कमी गुंतवणुकीत औषधी वनस्पती व्यवसाय कसा सुरू करावा याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

एक्सेल, एआयच्या मदतीने
डेटा अ‍ॅनालिसिस कार्यशाळा

व्यवसायातील निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक घेण्यासाठी डेटा विश्लेषणाचे कौशल्य विकसित करणारी प्रात्यक्षिक कार्यशाळा ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला होणार आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि एआयच्या सहाय्याने डेटा स्वच्छ करणे, त्याचे विश्लेषण करणे, आलेख व अहवाल तयार करणे आणि त्यातून उपयुक्त निष्कर्ष काढण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेत डेटा अ‍ॅनालिसिसची मूलभूत माहिती, डेटा क्लीनिंग, एक्सेलमधील महत्त्वाची सूत्रे व फंक्शन्स, सॉर्टिंग, फिल्टरिंग, फॉरमॅटिंग तसेच पिव्होट टेबल्स व पिव्होट चार्ट्‌सद्वारे मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्याचे तंत्र शिकवले जाईल. याशिवाय चार्ट्‌स, डॅशबोर्ड व डेटा व्हिज्युअलायझेशन तयार करणे, एआयचा प्रभावी वापर आणि व्यावसायिक उदाहरणांवर आधारित सराव घेतला जाणार आहे. व्यावसायिक, व्यवस्थापक, उद्योजक, विद्यार्थी आणि व्यवसाय मालकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : शिक्षक नियुक्तीच्या पारदर्शकतेवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब; शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

Vitamins Tips: कोणतं व्हिटॅमिन कधी घ्यावं? जाणून घ्या योग्य वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी!

Latest Marathi News Live Update : CJP च्या आंदोलनाशी माझा संबंध नाही’; नेहा बोरा यांचा न्यायालयात दावा

Narendra Modi: इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे मोदी खास पाहुणे! नेतान्याहूंनी आणखी कोणाला दिले निमंत्रण?

उत्तराखंडमधील मदरशांची शुक्रवारची सुट्टी रद्द? आता रविवारची साप्ताहिक सुट्टी लागू करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT