मुंबई

वेल्डिंग क्षेत्रात करिअरची संधी

CD

पुणे, ता. २३ : औद्योगिक क्षेत्रात कुशल वेल्डिंग तंत्रज्ञांची गरज लक्षात घेऊन ‘बेसिक वेल्डिंग टेक्नॉलॉजी’ प्रशिक्षण तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून २६, २७ व २८ ऑक्टोबरला आयोजिले आहे. वेल्डिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणे, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. प्रशिक्षणात एसएमएडब्ल्यू, टीआयजी आणि एमआयजी वेल्डिंग तंत्रांसोबत ऑक्सी-ॲसिटिलीन गॅस व प्लाझ्मा कटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. वेल्डिंग सिम्बॉल्स, वेल्डिंग प्रोसिजर स्पेसिफिकेशन यांची माहिती, तसेच विविध पोझिशन्समध्ये प्रत्यक्ष सराव करण्याची संधी देण्यात येणार आहे. सुरक्षित कामकाजासाठी आवश्यक नियम, वैयक्तिक संरक्षक साधनांचा वापर आणि वेल्डिंगदरम्यान घ्यावयाची खबरदारी यांवरही भर दिला जाणार आहे. उद्योगक्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरू शकतो. हे प्रशिक्षण तळेगाव-चाकण रोड, इंदुरी, तळेगाव दाभाडे, पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

औद्योगिक हायड्रॉलिक्सचे प्रगत प्रशिक्षण
औद्योगिक यंत्रसामग्रीतील हायड्रॉलिक सिस्टिमचे डिझाइन, कार्यप्रणाली आणि बिघाडांचे निदान यांचे प्रशिक्षण देणारा दोनदिवसीय ‘ॲडव्हान्स्ड इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स’ अभ्यासक्रम एसआयआयएलसी आणि तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने २८, २९ व ३० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षणात फ्लुइड मेकॅनिक्स, पास्कल्स लॉ, हायड्रॉलिक पंप्स व ॲक्च्युएटर्स, ॲक्युम्युलेटर सर्किट्स आणि कार्ट्रिज लॉजिक यांचा अभ्यास केला जाईल. तसेच इलेक्ट्रो-हायड्रॉलिक रॅपिड ट्रॅव्हर्स, क्रिप स्पीड सर्किट्स आणि पीएलसी आधारित हायड्रॉलिक सर्किट्स यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्यक्ष उपकरणांवर काम करण्यासह सिस्टिम डिझाइन आणि दोषनिदानाचे तंत्र शिकवले जाईल. तंत्रज्ञ, इंजिनिअरिंग विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणाचे आयोजन इंदुरी, तळेगाव दाभाडे, पुणे येथे करण्यात आले आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सेल्फ रिडेव्हलपमेंट कार्यशाळा
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वयंपुनर्विकास ही संकल्पना वेगाने पुढे येत असून, त्याबाबत सविस्तर माहिती देणारी कार्यशाळा ३१ ऑक्टोबरला आयोजिली आहे. स्वयंपुनर्विकास म्हणजे सोसायटीने स्वतः पुढाकार घेऊन विकसक न नेमता पुनर्विकास करणे. या पद्धतीमुळे जुन्या सदनिकाधारकांना भाडे, कॉर्पस फंड, बेटरमेंट चार्जेस तसेच इतर खर्चाचा अधिक फायदा मिळू शकतो. कार्यशाळेत स्वयंपुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, सोसायटीचे ठराव, शासकीय नियम, तसेच आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनिअर, कंत्राटदार व इतर सल्लागारांशी समन्वय कसा साधायचा, प्रकल्प सल्लागार कसा निवडावा, ठेकेदाराची निवड व दर्जेदार व वेळेत बांधकाम कसे सुनिश्चित करावे, याचीही माहिती दिली जाईल. इच्छुक सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासासाठी खात्रीशीर प्रकल्प सल्लागार सेवा (सशुल्क) उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT