मुंबई

कामगाराकडून महिलेचा विनयभंग

CD

रसायनी, ता. २९ (बातमीदार) : रसायनीतील भोकरपाडा येथील एका सोसायटीत फिनिशिंगचे काम करणारा कामगार घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २८) घडली. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुड्डू भोला यादव (रा. कल्याण ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरानंदानी फॉच्युर्न सोसायटी, भोकरपाडा येथे ३६ वर्षीय पीडित महिला त्यांच्या घरात एकट्याच बेडवर झोपल्या होत्या. त्यांचे शेजारी फ्लॅट नं. ४०२ मध्ये फिनिशिंगचे काम सुरू होते. गुड्डू हा पीडित महिलेच्या खोलीच्या बाल्‍कनीचे स्लायडिंगच्या खिडकीतून प्रवेश करून बेडरूममध्ये आला. या वेळी त्या झोपल्या असताना तो बेडवर त्यांच्याशेजारी बसला आणि मांडीवर हात ठेवून अंगलट करू लागला. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात यादवविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Survey : शक्तिपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा अद्याप नाही; सर्वेक्षणास सहकार्य करा, शंभूराज देसाईंच्या शेतकऱ्यांना सूचना

पोलिस निरीक्षकांना पदोन्नती अन्‌ अंतर्गत बदल्या! सोलापूर शहरातील 4 ‘पीआय’ पदोन्नतीच्या यादीत, तिघांची होणार खांदेपालट; 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

सोलापूरच्या पोलिस पथकावर पाथर्डीत गोळीबार! जेऊर येथील सराफा व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरण; साथीदारांसह आरोपी फरार, अक्कलकोट तालुक्यातील एकजण अटकेत

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ जून २०२६ ते १२ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

साधी कॉफी विसरा! केळं घालून बनवा व्हायरल Banana Coffee; शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

SCROLL FOR NEXT