मुंबई

वाचनातून व्यक्तिमत्त्व समृद्ध करा

CD

वाचनातून व्यक्तिमत्त्व समृद्ध करा

‘वर्तक वर्तमान’च्या तिसऱ्या अंकाचे प्रकाशन

विरार ता.१५ (बातमीदार) : पुस्तकांशी मैत्री जोडा, वाचलेल्या साहित्यावर विचार करा आणि त्यातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करा, असे आवाहन अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे आणि प्रा. शैलेश औटी यांनी केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या ‘वर्तक वर्तमान’ या त्रैमासिक वार्तापत्राच्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील तिसऱ्या अंकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

पुस्तकांमुळे अनुभवविश्व विस्तारते आणि विचारांना नवी दिशा मिळते, असे प्रा. शैलेश औटी यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबातून शैक्षणिक क्षेत्रापर्यंतच्या प्रवासात वाचनाने दिलेल्या बळाचाही त्यांनी उल्लेख केला. गुगल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप्स माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त असली, तरी सखोल आकलन आणि स्वतंत्र विचारांसाठी पुस्तकांचे वाचन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मराठी विभागातील पुस्तकसंग्रहाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्राचार्य डॉ. उबाळे यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन करणे, वाचलेल्या साहित्याचा सारांश स्वतःच्या शब्दांत लिहिणे आणि आठवड्यातून एकदा वाचलेल्या साहित्यावर चर्चा करणे, असे तीन संकल्प करण्यास सांगितले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत त्यांनी वाचनातून वैचारिक परिवर्तन घडत असल्याचे अधोरेखित केले. बाह्यरूपापेक्षा विचारांची समृद्धी महत्त्वाची असल्याचे सांगून त्यांनी सफदर हाश्मी यांची ‘किताबें कुछ कहना चाहती हैं’ ही कविता सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

Caller ID: आता अनोळखी कॉल्सचा खेळ खल्लास; Jio, Airtel, Vi ग्राहकांसाठी मोठा निर्णय, १ नोव्हेंबरपासून...

Marathi News Live Updates: जामनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात; ट्रक-दुचाकीच्या धडकेत ३ बालकांसह एकाच कुटुंबातील ६ ठार

Anand Dubey: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाने सोडली पक्षाची साथ, मशाल सोडून हाती घेतलं धनुष्यबाण

Kannad News : दुष्काळ, नापिकी आणि बेरोजगारीच्या चिंतेतून तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT