कारच्या पैशांवरून वाद;
मुलाकडून वडिलांची हत्या
पालघर, ता. १९ ः पालघरमध्ये २८ वर्षीय मुलाने आपल्या ५९ वर्षीय वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १८) घडली. मृताचे नाव मोहनलाल परमार (५९) असून, ते रामनगर परिसरात व्यापारी होते. पोलिसांनी घटनेनंतर तासाभरात मुलाला गुजरात राज्यातील भरूच येथून अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश परमार (२८) याने नवीन कार घेण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली. यावरून त्या दोघांचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने मुलाने घरातील ग्राईंडरने गळा कापून वडिलांची हत्या केल्याचे चौकशीतून समोर आले. परंतु हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना घरातील बेडरूममध्ये पलंगावर मोहनलाल यांचा मृतदेह आढळला. त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वी गावी गेली होती. घटनेच्या दिवशी घरात वडील आणि मुलगा हे दोघेच होते, अशी माहितीही चौकशीत समोर आली आहे.
मोहनलाल परमार यांचा दुसरा मुलगा घटनेच्या दिवशी कामानिमित्त वलसाड येथे गेला होता. त्याने वडिलांना अनेकदा फोन केले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याने पालघरमधील आपल्या अन्य भावाला घरी जाण्यास सांगितले. घरी पोहोचल्यानंतर वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
----------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.