मुंबई

कुडूस नाका येथे निवडणूक सुधारणांसाठी स्वाक्षरी मोहीम

CD

वाडा, ता. १६ (बातमीदार) : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर योग्य ती कार्यवाही व्हावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कुडूस नाका येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व ‘मनविसे’चे उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल यांनी केले.

या मोहिमेद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, झालेली एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे रद्द करणे, मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करून ईव्हीएमला पर्याय देणे, स्वच्छ व पारदर्शक मतदार याद्या तयार करणे, तसेच सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन निवडणूक प्रक्रिया राबविणे, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांसाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

स्वाक्षरी मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक देवेंद्र भानुशाली, सहसचिव मनोज चौधरी, उपतालुकाध्यक्ष चेतन गोरे, विशाल गोळे, प्रदीप घरत, वैभव हरड, मनीष बागुल, कौशल कासार, केशव शेलार, भावेश बागुल यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला पालघर जिल्हाध्यक्ष भावेश चुरीसाहेब, जिल्हा सचिव सतीश जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष धीरज गावड, शिवसेना उबाठा कामगार नेते मिलिंद चौधरी, उबाठा गटाचे नेते दीपक ठाकरे, कामगार नेते रमेश भोईर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष परशुराम भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हाेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT