मुंबई

काय सांगता कल्याण स्थानकावर 'इतक्या' लाखांचा गांजा जप्त! कोण आहेत हे बहाद्दर वाचा...

रविंद्र खरात (बातमीदार-कल्याण )


कल्याण - कल्याण रेल्वे स्थानकात अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने सापळा रचून एकाला अटक केली असून त्याकडून सुमारे 2 लाखा रुपयांपेक्षा  अधिक रकमेचा गांजा जप्त केला. 

मंगला एक्सप्रेसने एक प्रवासी गांजा नेणार असल्याची माहिती मिळताच  बुधवारी  कल्याण रेल्वे स्थानकात एक वाजता अंमली नियंत्रण पथकाचे ए. के. गुप्ता आणि एस. सम्राट यांनी कल्याण रेल्वे महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना साहू यांच्यासह कल्याण रेल्वे स्थानक  फलाट 4 आणि 5 वर सापळा रचला होता.

मंगला एक्स्प्रेस विशेष मेल येताच पथकाने प्रवासी वर्गाच्या सामानाची तपासणी सुरू केली होती. या तपासणीमध्ये घाटकोपर राहणारा सलीम अयुब शेख ( 38) याची बॅग तपासणी केली असता गांजाची पानेप्रत्येकी 2 किलो वजन असलेली 6 पाकिटे आढळून आली. याची किमत अंदाजे 2 लाख 40 हजार इतकी असून अंमली पदार्थ नियत्रण पथकाने हा गांजा जप्त केला आहे. त्याने दिलेल्या माहिती नुसार त्याला कल्याण स्टेशन जवळ हफीस नावाच्या व्यक्तीने हे अमली पदार्थ त्याला इच्छित स्थळी पोचविण्यासाठी 10 हजार रुपये दिल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने शेख याला ताब्यात घेतले असून त्याने दिलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे .

----------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : मोठी बातमी! तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूरमध्ये मारहाण; हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्यानंतर हल्ला

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: रायगडच्या इंदापूर येथे एसटी चालकाला भररस्तात मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT