मुंबई

वरळीत लिफ्ट कोसळून ५ जणांचा मृत्यू; आदित्य ठाकरे घटनास्थळी

सुरज सावंत

वरळी: राज्यभरात दरडी कोसळल्यामुळे दुर्घटना घडत असताना वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 35 वर्षीय व्यक्तीही गंभीर जखमी झाला असून त्याची स्थिती गंभीर असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

वरळी अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. त्यात या निर्माणाधीन इमारतीत संध्याकाळच्या सुमारास बांधकामासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची स्थिती गंभीर आहे.

आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आहेत. "प्रथमदर्शनी लिफ्ट ओव्हरलोडिंगमुळे कोसळल्याचे कळते. या ठिकाणी बचावकार्य अद्याप सुरु आहे," असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अविनाश दास(35) याला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. याशिवाय लक्ष्मण मंडल(35) याच्यावर उपचार सुरू असून त्याची स्थीती गंभीर आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात भरत मंडल(28), चिन्मय मंडल(33) व 45 वर्षीय व्यक्तीला नेण्यात आले होते. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून पाच जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू आहे. काही जणआत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Army Jawan Success : जिद्द असावी तर अशी! निवृत्तीनंतर साताऱ्याच्या माजी सैनिकानं एकाच वर्षात 'क्रॅक' केल्या तब्बल 12 सरकारी परीक्षा; एकामागून एक कशा दिल्या Exam?

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

SCROLL FOR NEXT